प्रिय सुमित्राताई, आभार मानायचेत तुमचे. ते खूप महत्त्वाचं आहे. किती गोष्टींबद्दल कितीदा तरी ते मानावे लागतील…
काय काय आणि किती किती लिहू? ‘एक कप च्या’मध्ये माझ्या व्यक्तिरेखेच्या तोंडी तुम्ही लिहिलेलं एक वाक्य आहे- ‘जेवढा तो रथ मोठा, तेवढा त्याला हलायला वेळ लागणारच की!’ दिलखुलास व आशावादी असण्यानं इतक्या सार्या सिनेमांचा हा मोठ्ठा रथ आज तुम्ही यशस्वीरित्या ढकलत आणला आहात. त्या रथामध्ये किती आनंदानं तुम्ही कित्येकांना सामील करून घेतलंत, आपलंसं करून घेतलंत. तो रथ पुढे घेऊन जायची जबाबदारी आता आम्हा सगळ्यांची आहे.......